Last Updated: Monday, June 24, 2013, 17:39
www.24taas.com, झी मीडिया, आग्राउत्तर प्रदेशातील आग्रा शहरात एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आले आहे. हे रॅकेट फेसबुकद्वारे ग्राहकांची बुकिंग घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आग्र्यातील बाल्केश्वर भागातील गोविंदपुरी कॉलनीतील दोन मजली इमारतीतून रविवारी ११ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक पवन कुमार यांनी सांगितले.
शेजारी राहणाऱ्यांकडून करण्यात आलेल्या वारंवार तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. छापा टाकऱ्या पोलिसांनी बीअर कॅन, दारुच्या बाटल्या आणि इतर बाबी जप्त केल्या.
हे रॅकेट बनावट फेसबुक खात्यांद्वारे चॅटिंग करून ग्राहकांचा शोध करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे ग्राहक सापडल्यावर त्यांना मुली पुरविण्याचे काम केले जात असे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 24, 2013, 17:39