Last Updated: Wednesday, August 21, 2013, 12:53
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्लीआध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात दिल्लीत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्लीतल्या कमला नगरमध्ये राहणाऱ्या जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं तक्रार केल्यावर, कमला मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही मुलगी आसाराम बापूंच्या गुरुकुलात शिक्षण घेत होती.
जोधपूरमधील आसाराम बापूंच्या गुरूकुलमध्ये ही मुलगी शिक्षण घेत असतांना, या काळात आसाराम बापूंनी अनेकवेळा आश्रमात बोलवून लैंगिक शोषण केल्याचा या मुलीचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत जोधपूर पोलिसांना माहिती दिली आहे. या मुलीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटलंय, की आसाराम बापूंच्या आश्रमात त्यांच्यासह अनेकांनी माझं लैंगिक शोषण केलंय. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, या मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आलंय.
याआधीही अध्यात्मिक गुरू असलेल्या आसाराम बापूंवर अशाप्रकारचे आरोप झालेले आहेत. मात्र हे सर्व आरोप चुकीचे असल्याचं आसाराम बापूंच्या प्रवक्त्यानं म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 21, 2013, 12:14