Last Updated: Thursday, March 14, 2013, 15:46
www.24taas.com, मुंबई आता जर तुम्हाला ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमचं पॅन कार्ड नक्की खिशात ठेवा. याशिवाय अशा खरेदीदारांची माहिती सोनारांना किंवा डिलर्सना सरकारपर्यंत पोहचवावी लागेल.
सध्या, पाच लाख रुपयांपर्यंत सोन्याचे दागिने किंवा दोन लाखांच्या सोन्याची खरेदी केल्यास पॅनकार्ड सादर करणं आवश्यक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारनं ‘प्रीव्हेन्शन ऑफ अॅन्टी मनी लॉन्ड्रींग अॅक्ट’मध्ये बदल केलाय. यानुसार हिरे व्यापाऱ्यांनादेखील ‘केवायसी’ (नो यूअर कस्टमर) नियमांचं पालन करणं गरजेचं असेल. सरकारनं व्यवहारांची माहिती मागविल्यानंतर डीलर्सना आपल्या ग्राहकांची पूर्ण माहिती सादर करावी लागेल.
आयटी विभाग यासंबंधात ठराविक रकमेचं नोटीफिकेशन जाहीर करणार आहे. याशिवाय सर्व व्यावसायिकांना पाच वर्षांपर्यंतच्या व्यवहारांचं रेकॉर्डही ठेवावं लागेल.
सरकारचा सोनं खरेदीदारांवर नियंत्रण ठेवायचा हा प्रयत्न आहे. त्याचमुळे सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांवर सरकारकडून कडक नियम लागू करण्यात आलेत.
First Published: Thursday, March 14, 2013, 15:46