`भाजपमध्ये सिद्धूची घुसमट होतेय...`, `Sidhu feeling suffocated, may quit politics`

`भाजपमध्ये सिद्धूची घुसमट होतेय...`

`भाजपमध्ये सिद्धूची घुसमट होतेय...`
www.24taas.com, नवी दिल्ली

भाजप खासदार नवज्योत सिंग सिद्धू पक्षात नाराज असल्याचं समजतंय. त्यांची पत्नी नवज्योत कौर यांनीच तसे संकेत दिलेत. सिद्धू भ्रष्ट नसल्यामुळे पक्षात वेगळे पडल्याचा त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सिद्धू राजकारणातून कायमचा संन्यास घेण्याच्याही विचारात आहेत.

भाजप खासदार म्हणून नवज्योत सिंग सिद्धू राजनैतिक जीवनातील कठिण प्रसंगांतून जात असल्याचं नवज्योत कौर यांचं म्हणणं आहे. ‘भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव येतोय. त्यामुळेच टीव्ही शो कडे पुन्हा एकदा वळण्याच्या विचारात सिद्धू आहेत, त्यांची पक्षात घुसमट होतेय’ असं नवज्योत कौर यांनी म्हटलंय. जी व्यक्ती भ्रष्टाचाराकडे पाठ फिरवते, अपराध्यांना पाठिंबा देत नाही तो एखाद्या पक्षासाठी काय चांगलं करू शकते, असंही त्या विचारतात.

भाजपच्या गोटात अनेक सेलेब्रिटी आहेत. त्यात माजी क्रिकेटपटू आणि सध्या कॉमेन्टेटर म्हणून प्रसिद्ध असलेले सिद्धू अमृतसरमधून लोकसभेवर निवडून गेलेत. पण, गेल्या कित्येक महिन्यांपासून ते या भागात फिरकलेदेखील नाहीत. त्यांनी अनेक टीव्ही शोचे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेत. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जागा न मिळाल्यानं सिद्धू निराश झालेत.

First Published: Thursday, April 11, 2013, 15:25


comments powered by Disqus