Last Updated: Thursday, January 30, 2014, 14:31
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीराहुल गांधी यांनी एका इंग्रजी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही शीख संघटनांनी आज दिल्लीतील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे.
पोलिसांनी लावलेले बॅरिकेटस ओलांडण्याचा प्रयत्न यावेळी आंदोलकांनी केला. या आंदोलनात अकाली दल आणि दिल्ली शीख गुरदवारा प्रबंधक समितीही सामिल आहे.
इंग्रजी चॅनेल्सला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी काही काँग्रेसजन, १९८४ च्या दंगलीत सामिल असल्याचं मान्य केलं, यानंतर शीख संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत.
राहुल गांधी यांनी दंगलीत सामिल असलेल्या काँग्रेस नेत्यांची नावं घ्यावीत, अशी मागणी या संघटनांनी केली आहे, तसेच शीखविरोधी दंगलींची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही काही संघटनांनी केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील शीख दंगलींची चौकशी, एसआयटी मार्फत करण्याची मागणी उप राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केली आहे.
जर शीख दंगलींची चौकशी एसआयटीमार्फत झाली, तर काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 14:31