राहुल गांधींच्या घरासमोर पुन्हा शीख संघटनांचं आंदोलन

Last Updated: Monday, February 3, 2014, 18:01

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 साली उसळलेल्या शीख विरोधी दंग्याचं भूत काँग्रेसच्या मानगुटीवर पुन्हा बसल्याचं चित्र आहे. 1984 दंगलीविरोधात आज पुन्हा एकदा राहुल गांधींच्या घराबाहेर शीख संघटनांनी निदर्शनं केली.

शीख संघटनांची दिल्लीत काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं

Last Updated: Thursday, January 30, 2014, 14:31

राहुल गांधी यांनी एका इंग्रजी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही शीख संघटनांनी आज दिल्लीतील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे.

‘सिंग इज किंग’, पंतप्रधान ठरले अव्वल ‘सिंग’!

Last Updated: Sunday, November 10, 2013, 20:30

जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग अव्वल नंबरवर आहेत. ‘शीख १००’ या मासिकानं जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख असल्याचं म्हटलंय.

ब्रिटिश तरुणीचा शीख वृद्धावर हल्ला

Last Updated: Monday, August 19, 2013, 09:31

लंडनमध्ये १९ वर्षीय ब्रिटीश युवतीनं एका ८० वर्षीय शीख वयोवृद्धास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. मारहाणीत शीख गृहस्थ गंभीर जखमी झाला असून युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

लहानपणी हरवलेला भाऊ भेटला `फेसबुक`मुळे!

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 10:15

लहानपणी घरातून निघून गेलेला एक मुलगा एका तपानंतर म्हणजेच तब्बल १२ वर्षांनी घरी परतला. अर्थात यात विशेष असं काही नाही. मात्र हे अनोखं मिलन घडून आलय फेसबुकच्या सहाय्यानं..

शीख समाजाची बाळासाहेबांना जागतिक मानवंदना

Last Updated: Sunday, March 24, 2013, 18:31

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला शीख समाजानेही अभिवादन केलं आहे. शीख समाजाचे संस्थापक धर्मगुरू गुरू नानक यांच्या जीवनावर तयार होत असणारा चित्रपट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण करण्यात येणार आहे.

दलेर मेहंदीचा मुलगा बनला बॉलिवूड अभिनेता

Last Updated: Monday, December 10, 2012, 16:54

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचा मुलगा गुरदीप अभिनेता बनून सिनेमातून पदार्पण करत आहे. ‘मेरी शादी करवाओ’ या सिनेमातून गुरदीप हिरो बनून बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. मात्र सिनेमात अभिनेता म्हणून जरी येणार असला, तरी गुरदीप आपल्या धर्माचं पालन करत पगडी सोडणार नाही आणि दाढी मिशीलाही कात्री लावणार नाही.

गुरुद्वारावर हल्ला करणाऱ्यानं केली होती आत्महत्या!

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 13:45

गुरुद्वारावर गोळीबार करून सहा शीखांची हत्या करणाऱ्या तरुणाचा मृत्यू पोलिसांच्या चकमकीत झाला नव्हता तर, पोलिसांची गोळी फक्त त्याच्या पोटात लागली होती... त्यानंतर स्वत:ला संपवण्यासाठी त्यानं स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

वॉशिंग्टनमध्ये शीख पगडीधारी पोलीस

Last Updated: Thursday, May 17, 2012, 15:58

शीख पोलिसांना आपल्या धार्मिक चिन्हांसहीत काम करण्याची परवानगी देणारं, वॉशिंग्टन हे अमेरिकेतील पहिलं शहर ठरलं आहे.

'सोनिया गांधींना अमेरिकेतून हाकला'

Last Updated: Saturday, March 3, 2012, 16:37

अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तात्काळ अमेरिकेतून हाकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अमेरिकेतील एका शीख संघटनेने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन या संघटनेने हिलरी यांना दिले आहे.