Last Updated: Monday, May 19, 2014, 12:13
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिमी या दहशतवादी संघटनेच्या निशाणावर आहेत ही गोष्ट पुन्हा समोर आली आहे. `स्टूडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया`च्या म्हणजेच सिमीच्या दहशतवाद्यांना भोपाळच्या कोर्टात हजर करत असतानाच, दहशतवाद्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा तर दिल्याच, पण मोदींना मारण्याची धमकी देखील दिली.
देशात सिमी या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सिमीच्या १५ दहशतवाद्यांना विविध आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याच दहशतवाद्यांना भोपाळ कोर्टात हजर करत असताना, त्यांनी मोदीं विरूद्ध `अब की बार मोदी का नंबर` अशा घोषणा दिल्या. याचप्रमाणे `दुनिया की एकही ताकत अल्लाह है, तालिबान आयेगा और नरेंद्र मोदी जायेगा` अशा घोषणा देण्यात आल्या.
हा प्रकार भोपाळ कोर्टाच्या आवारात पोलिसांच्या समोरच घडत असल्याने, परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. पण नंतर पोलिसांनी परिस्थितीवर ताबा मिळवला आणि दहशतवाद्यांना पोलीस व्हॅनमधून नेण्यात आले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 19, 2014, 12:13