जेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट,six year old boy with 12 inch tail is worshipped as hanuman

जेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट...

जेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट...

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशात एका सहा वर्षांच्या मुलाला सध्या देवत्व बहाल केलं गेलंय... आजुबाजुचे लोक इतकंच काय तर कुटुंबीयही देव समजून त्याची पूजा करतात... त्याचं कारण म्हणजे या मुलाला उगवलेलं शेपूट...

ब्रिटिश वेबसाईट `डेली मेल`च्या म्हणण्यानुसार, या मुलाचं नाव अमर सिंह आहे. मुलाच्या पाठीवर कमरेच्या भागावर जाड जाड केसांची एक बट उगवलीय. याला काही लोक शेपूट म्हणत आहेत. अमरच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अमरच्या जन्मापासून ही केसांची बट आहे... जी आता बरीच लांब झालीय.

अरमच्या कमरेवर उगवलेली ही केसांची बट कापली जाऊ शकत होती. परंतु, अमरचे कुटुंबीय याला `देवाची भेट` समजत आहेत. काही लोक याला हनुमानाचा पुनर्जन्म मानत आहेत. त्यांनी अमरची देव म्हणून पूजा-अर्चनाही सुरू केलीय.

काय सांगतं विज्ञान...
शास्त्रीय भाषेत सांगायचं तर या केसांच्या वाढिला `स्पाइना बाइफिडा` म्हटलं जातं. हा आजार जन्मजातच असतो. व्यक्तीच्या माकडहाडाच्या आसपासची हाडं योग्य रितीनं विकसित झाली नाही तर हा आजार उद्भवतो. त्यामुळेच व्यक्तीच्या अंगावर केस उगवणं सुरू होतात. यामुळे, अर्धांगवायूही होण्याची शक्यता असते.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 16, 2014, 08:15


comments powered by Disqus