Last Updated: Wednesday, October 23, 2013, 08:28
www.24taas.com, वृत्तसंस्था, उन्नावउत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडामध्ये शहीद राजा राव रामबक्श सिंह यांच्या किल्ल्यात १००० टन सोनं मिळण्याचा दावा करणाऱ्यांनी पुन्हा एक नवा दावा केलाय. शोभन सरकारचे शिष्य ओमबाबा यांनी या खोदकामात नालंदासारख्या प्राचीन सभ्यतेसारखे अवशेष मिळण्याचा दावा केलाय.
ओमबाबानी पत्रकारांसोबत बोलतांना सांगितलं की, “खोदकाम १८ फूटपर्यंत पोहोचण्याची वाट पाहा, त्यानंतर नालंदासारख्या प्राचीन सभ्यतेचे अवशेष मिळतील.” किल्ल्यात सोन्याचा खजिना दडलेला असल्याच्या आपल्या दाव्याबद्दल ओमबाबा म्हणाले, की पंतप्रधान आपल्या कर्मचाऱ्यांसह इथं आल्यास खजिना बाहेर काढून दाखविन असा दावाही ओमजी यांनी केलाय.
दरम्यान बिघापूरचे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी विजय शंकर दुबे यांनी सांगितलं की, खोदकामाच्या पाचव्या दिवशी मातीचे भांडे, फुटलेल्या लाखेच्या बांगड्या मिळाल्या. पाच दिवसांच्या खोदकाम १९२ सेंटीमीटरपर्यंत पोहोचलंय. तर आज एएसआयची टीम आज सुट्टीवर असेल, त्यामुळं खोदकाम बंद असेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, October 23, 2013, 08:28