सोनिया अण्णांवर का झाल्या उदार?, sonia`s letter to anna hazare

सोनिया अण्णांवर का झाल्या उदार?

सोनिया अण्णांवर का झाल्या उदार?
www.24taas.com, नवी दिल्ली

‘आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात, लोकपाल बिल मंजूर करु’ असं आश्वासन यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना दिलंय.

अण्णा हजारेंनी लोकपाल बिलाबाबत २२ जानेवारी रोजी सोनिया गांधींना पत्र पाठवलं होतं. या पत्राला सोनिया गांधींनी उत्तर पाठवलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी हे आश्वासन दिलं असलं तरी निर्णय संसदेतच होईल, असंही स्पष्ट केलंय. लोकपाल बिलावर सर्वसहमती होण्यासाठी राज्यसभेत चिकित्सा समिती स्थापना करण्यात आली होती. गेल्या अधिवेशनात या समितीनं अहवाल सादर केलाय. मात्र, लोकपालातील आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये सहमती होऊ शकलेली नाही.

टीम अण्णामध्ये झालेल्या फूटीनंतर बऱ्याच दिवसांपासून मागे पडलेल्या लोकपाल बिलाच्या मुद्यावर बजेट अधिवेशनापूर्वी पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. समाजवादी पार्टी मात्र लोकपाल बिलाच्या विरोधातल्या भूमिकेवर ठाम आहे.

First Published: Tuesday, January 29, 2013, 08:40


comments powered by Disqus