Last Updated: Friday, May 3, 2013, 16:25
www.24taas.com, झी मीडिया, रायपूर रायपूरमधील कुकुरबेडा येथील एका बीसीएच्या विद्यार्थ्यांने आपल्या शेजारी राहणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत अश्लील चाळे केले. मुलीने धावत जाऊन आपल्या आईला घडलेली घटना सांगितली. पोलिसात ह्याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो आपल्या घरी एकटा ब्ल्यू फिल्म पाहत होता. त्याचवेळी शेजारी असणारी सात वर्षीय मुलगी त्याला दिसली. आणि त्यांच्यात सैतान संचारला. त्याने त्या मुलीला घरात घेऊन तिलाही ब्ल्यू फिल्म दाखवली. आणि त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
मुलगी त्याच्या ह्या हरकती समजू शकली नाही. तेथून तिने पळ काढला. आणि घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आरोपीने सांगितले की, मागील तीन दिवसापासून त्याच्या घरातील सर्वजण लग्नासाठी बाहेर गेले आहेत. परिक्षेमुळे तो घरीच होता. शेजारी राहणारी सात वर्षीय मुलगी नेहमी त्याच्या घरी येत-जात असे. ती खेळत खेळत त्यावेळेस तेथे आली. आणि त्याचवेळी आरोपी लॅपटॉपवर ब्ल्यू फिल्म पाहत होता.
First Published: Friday, May 3, 2013, 16:25