विद्यार्थ्यानं स्वत:च्याच आत्महत्येचा बनवला व्हिडिओ, student suicide in front of mobile camera in bh

विद्यार्थ्यानं स्वत:च्याच आत्महत्येचा बनवला व्हिडिओ

विद्यार्थ्यानं स्वत:च्याच <B> <font color=red> आत्महत्येचा</font></b>  बनवला <B> <font color=red>व्हिडिओ </font></b>

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

भोपाळच्या अयोध्या नगर भागात ‘बीबीए’च्या एका विद्यार्थ्यानं मोबाईलवर स्वत:च्याच आत्महत्येचा व्हिडिओ बनवलाय.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या नगर भागात राहणाऱ्या संजय महेश्वरी यांच्या मुलानं तणावग्रस्त अवस्थेत आत्महत्या केलीय.

महेश्वरी यांचा १८ वर्षांचा मुलगा संजोग हा एनआरआय महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होता. महेश्वरी यांचं किराना व्यवसाय आहे. संजोग हा गेल्या काही दिवसांपासून तणावग्रस्त अवस्थेत होता. सोमवारी रात्री संजोगच्या वडिलांनी आपल्या मुलाचा आवाज ऐकला आणि त्यांची झोप उडाली. त्यांनी बाहेर येऊन किचनमध्ये पाहिलं तेव्हा संजोग फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसला.

संजय महेश्वरी यांना यामुळे जोरदार धक्का बसला. त्यांनी संजोगला खाली उतरवलं परंतु तेव्हापर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. संजोगनं दोन पानांचं एक सुसाइड नोटही लिहून ठेवलं होतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, फासी लावण्यापूर् संजोगनं आपल्या मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ मोड सुरू करून ठेवला होता. हा मोबाईल त्यानं अशा पद्धतीनं ठेवला ज्यामुळे त्याची आत्महत्या या पूर्ण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालीय.

या व्हिडिओत संजोगनं ‘आई-बाबा मला माफ करा, तुम्ही माझ्यावर खूप खर्च केलाय. पण, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मी अपयशी ठरलो. माझ्या मृत्यूचं कारण आणि घटनाक्रम मोबाईलमध्ये आहे. मला या चुकीसाठी माफ करा’ असं म्हटलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 18, 2013, 11:40


comments powered by Disqus