विद्यार्थ्याने बनवला स्वतः आत्महत्येचा व्हिडिओ..., students created a hanging mobile video of himsel

विद्यार्थ्याने बनवला स्वतः आत्महत्येचा व्हिडिओ...

विद्यार्थ्याने बनवला स्वतः आत्महत्येचा व्हिडिओ...
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

भोपाळच्या आयोध्यानगर भागात बीबीएच्या एका विद्यार्थ्याने मोबाईल फोनवर स्वतःच्या आत्महत्येचा व्हिडिओ बनविला. या घटनेने परिसरात खळबळीचं वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयोध्यानगर भागात राहणारे किराणा व्यापारी संजय महेश्वरी यांचा १८ वर्षाचा मुलगा संजोग एनआरआई कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात असल्याचे घरच्यांनी सांगितले. सोमवारी पहाटे संजोग याच्या वडिलांचे डोळा आपल्या मुलाच्या आरोळीने उघडला. बाहेर येताच आपला मुलगा किचनमध्ये फाशीच्या फंद्यावर लटकत होता.

संजयने आपल्या मुलाला कसे तरी खाली उतरविले, पण त्याचा मृत्यू झाला होता.
संजोगने दोन पानांचा सुसाइड नोटही लिहिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फाशी घेण्यापूर्वी संजोगने आपला मोबाईल फोन व्हिडिओ मोडवर किचनमध्ये अशा अँगलने ठेवला होता, की त्यात आत्महत्येचा व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड़ झाला.

मोबाईलमध्ये सर्वात पहिले संजोगने आपल्या आई मला माफ कर.... तुम्ही माझ्यावर खूप खर्च केला. पण मी तुमच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही. माझ्या मरणाचे कारण आणि घटनाक्रम मोबाईलमध्ये आहे, मला माफ करा....


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 19:06


comments powered by Disqus