सुनंदा पुष्करांच्या नावावर १०० कोटीपेक्षा जास्त ,sunanda pushkar`s assets worth nearly rs.100 crore

सुनंदा पुष्करांच्या नावावर १०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती...

सुनंदा पुष्करांच्या नावावर १०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती...
www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्करच्या नावावर १०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती होती. आयपीएल २०१० मध्ये कोची टस्कर संघासाठी ७० कोटीची भागिदारी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सोडावी लागली होती. त्यावेळी शशी थरूरांनी ७० कोटी जमवल्याचा आरोप झाला होता.

५० कोटींची गर्लफ्रेंड या शब्दात टीका नरेंद्र मोदीनी केली होती. एका मुलाखती दरम्यान आपण बिजनेस वुमन आहोत. शशी थरूर यांच्या प्रतिनिधी नाही, अशा शब्दात पुष्कर यांनी प्रतिक्रिया दिली होती. वेगवेगळ्या बँकामधील ठेवी,विविध कंपन्यातील गुंतवणूक, चालू खात्यावरील पैसे मिळून ७ कोटी रूपये सुनंदा पुष्करच्या नावावर आहेत. ओन्टारीया कॅनडा येथे ३.५ कोटींच घरासह दुबई येथे तब्बल ९३ कोटींच्या १२ अपार्टमेन्टस् नावावर आहेत. त्यातील काही भाड्याने देण्यात आलेल्या आहेत.

विदेशी बनावटीची २५ घड्याळं तब्बल ३ कोटींची आहेत. सुनंदांच्या खजिन्यात २ कोटींचे दागिने आहेत. शाहतुश शालीची किंमत ३० लाखांच्या आसपास आहे. हुमायुनच्या काळातील ढाल-तलवार जीची किंमत करणं कठीण आहे.










इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 21, 2014, 20:51


comments powered by Disqus