सुनंदा पुष्कर यांची हत्या? तपासात प्रगती नाहीSunanda Pushkar`s death: `Viscera report hints at drug

सुनंदा पुष्कर यांची हत्या? तपासात प्रगती नाही

सुनंदा पुष्कर यांची हत्या? तपासात प्रगती नाही
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कुठलीही प्रगती झालेली नाही. व्हिसेरा अहवालात त्यांनी औषधाचं अतिसेवन केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या अहवालातील नोंदी या गुन्हा नोंदवण्यासाठी पुरेशा नसल्याचं म्हटलं आहे.

यामध्ये विषप्रयोगाची शक्यता नाकारण्यात आली आहे. औषधांच्या अतिसेवनानं निर्माण झालेल्या विषक्तपणाचा उल्लेख करण्यात आलाय. विषप्रयोग झाला असेल तर त्याची नोंद या अहवालात होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं काहीच घडलं नाही.

२१ जानेवारीला सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हत्या झाली की, आत्महत्या याचा तपास घेण्यासाठी उपविभागीय मॅजिस्ट्रेटनं दिल्ली पोलिसांना सांगितलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 24, 2014, 08:42


comments powered by Disqus