सुनंदा पुष्कर यांनी दिली काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानाखाली, sunanda pushkar slaps congress activist

सुनंदा पुष्कर यांनी दिली काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानाखाली

सुनंदा पुष्कर यांनी दिली काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानाखाली

www.24taas.com, तिरूवनंतपुरम
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेल्या शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर आणि वाद हे ठरलेले असतात. थरुर हे स्वतःच्या ट्विटरवरील कमेंटमुळे नाही तर सुनंदा पुष्कर यांनी केलेल्या कारनाम्यामुळे थरूर चर्चेत आहेत. सोमवारी शशी थरूर आणि त्यांची पत्नी सुनंदा तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. यावेळी अशी काही परिस्थिती निर्माण झाली की सुनंदा पुष्कर यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कानाखाली एक नाही दोन-चार जडवून दिल्या.

सुनंदा या एका काँग्रेस कार्यकर्त्याला थप्पड मारतानाच व्हिडीओ युट्युबवर टाकण्यात आला आहे. या व्हिडीओची जोरात चर्चा सुरु आहे.

दुस-यांदा मंत्रिपद मिळाल्यामुळे शशी थरुर मतदारसंघात जाणार होते. त्याचवेळी थरुर यांच्या् समर्थकांची एकच गर्दी झाली आणि कार्यकर्त्यांनी सुनंदा यांना गराडा घातला. त्यापैकी एकाने सुनंदा यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या सुनंदा यांनी त्याला जोरात थप्पड मारली आणि कारमध्येा बसून निघून गेल्या. या घटनेने कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

First Published: Tuesday, October 30, 2012, 21:04


comments powered by Disqus