नारायण साईंच्या तपास अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकीSurat DCP alleges threat to life from Asaram sup

सुरतच्या डीसीपींना नारायण साई समर्थकाकडून जीवे मारण्याची धमकी

सुरतच्या डीसीपींना नारायण साई समर्थकाकडून जीवे मारण्याची धमकी
www.24taas.com, झी मीडिया, सुरत

नारायण साईंविरोधातल्या बलात्कार प्रकरणात चौकशी करत असलेल्या सुरतच्या पोलीस अधिकारी शोभा भुताडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. नारायण साईंविरोधात यापुढं अधिक चौकशी कराल तर जीव गमवावा लागेल या भाषेत त्यांना धमकावण्यात आलंय.

अधिकारी शोभा भुताडे यांना फोन करणाऱ्या व्यक्तीनं स्वत:ला सेवादार म्हटलंय. काल या प्रकरणात सुरतमधल्या उमराह पोलीस स्टेशनमध्ये आसाराम बापूंविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना धमकीचे फोन आला.

त्यानंतर चौकशी केल्यानंतर तो मध्य प्रदेशातल्या जशरत सिंगकडून फोन आल्याचं समजतंय. यासंदर्भात पोलीस आणखी तपास करतायत. त्यामुळं आता आसाराम बापू आणि नारायण साई या पिता-पुत्रांच्या अडचणीत अधिकच वाढ झालीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 21, 2013, 14:48


comments powered by Disqus