Last Updated: Saturday, September 22, 2012, 22:51
www.24taas.com, नवी दिल्ली अण्णा हजारेंचे सहकारी आणि स्वीय सहायक सुरेश पठारे यांनीही आता अण्णा हजारेंची साथ सोडलीय.
पठारे यांनी आपला भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा त्यांचा राजीनामा अण्णांकडे सोपवला असून अण्णांनी पठारेंचा राजीनामा मंजूर केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण हा राजीनामा देत असल्याचं कारण सुरेश पठारे यांनी दिलंय. मात्र, मागील काही दिवसांपासून अण्णांचे सहकारी त्यांच्यापासून दूर जात असल्याचं चित्र आहे.
First Published: Saturday, September 22, 2012, 22:51