Last Updated: Wednesday, February 27, 2013, 21:21
www.24taas.com, कोलकाताकोलकातामध्ये सूर्यसेन मार्केटमधील एका सहा मजली कॉम्प्लेक्साला आज बुधवारी भीषण आग लागल्याने १९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशामन दलाच्या अठरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. नागरिक झोपेत असताना आग लागल्याने काही जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या इमारतीत तीस ते चाळीस जण असल्याची भिती पोलिसांनी वर्तविली. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली.
या कॉम्प्लेक्सममध्ये प्लास्टिकच्या साहित्याची दुकाने आणि पेपर गोडाऊन असल्याने आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहाणी केली.
First Published: Wednesday, February 27, 2013, 21:21