राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणारSushilkumar Shinde to replace Prithviraj

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.

झी मीडियानं सर्वप्रथम बुधवारी मुख्यमंत्री बदलाची बातमी दिली होती. महाराष्ट्रासह आसाम आणि हरियाणाचे मुख्यमंत्रीही बदलण्याचा काँग्रेस हायकमांडचा विचार असल्याचं समजतंय. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही बदलण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह आणखी ८-१० राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात नेतृत्वबदल होणार असल्याच्या बातमीनं सध्या एकच खळबळ उडालीय...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 22:25


comments powered by Disqus