Last Updated: Saturday, September 28, 2013, 12:50
www.24taas.com, वृत्तसंस्था, जम्मूजम्मूत दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आज कठुआ जिल्ह्यातील दयालचक भागात अतिरेकी घुसल्याचे वृत्त आहे. हे अतिरेकी घुसलेल्या शाळेला लष्काराने घेरले आहे. परिसरात रेड अलर्ट जारी केलं आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात १२ लोक ठार झालेले असून त्यात एका आर्मी ऑफिसरचा समावेश आहे.
कठुआ जिल्ह्यातील दयालचक भागातील पथराला गावातील एका शाळेच्या इमारतीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील संशयित अतिरेकी घुसले आहेत. राज्य पोलीस आणि लष्कर यांनी संयुक्त शोध मोहीम दयालचक भागात सुरू केली आहे. शाळेच्या इमारतीला वेढा घालण्यात आला आहे.
राज्य पोलीस आणि लष्कराने खबरदारी म्हणून जम्मू-पठाणकोट महामार्ग बंद केला आहे. लष्करी छावणी आणि पोलीस मुख्यालया बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांनी ठार करण्यात आले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, September 28, 2013, 12:46