भाजप नेते गिरीराज सिंह यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 12:12

भाजप नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशामध्ये अनेक लोक मोदींना रोखण्याचा प्रयत्न करत असून अशा व्यक्तींचा राजकीय मक्का-मदिना पाकिस्तानात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू, ३ जखमी

Last Updated: Friday, March 28, 2014, 09:02

जम्मू जवळ कथुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झालेत. सैनिकांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बोलेरो गाडीवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-पाठणकोट महामार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

जम्मूत शाळेत घुसलेत अतिरेकी, लष्कराने घेरले शाळेला

Last Updated: Saturday, September 28, 2013, 12:50

जम्मूत दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज कठुआ जिल्ह्यातील दयालचक भागात अतिरेकी घुसल्याचे वृत्त आहे. हे अतिरेकी घुसलेल्या शाळेला लष्काराने घेरले आहे. परिसरात रेड अलर्ट जारी केलं आहे.

बाटला हाऊस एन्काऊंटर : शहजाद अहमदला जन्मठेप!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 18:09

२००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस प्रकरणात एकमेव दोषी असणारा इंडियन मुजाहिदीन मधला शहजाद अहमद याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांना न्याय मिळाला.

बाटला हाऊस प्रकरणात शहझाद दोषी

Last Updated: Thursday, July 25, 2013, 16:46

2008 साली झालेल्या दिल्लीतल्या बाटला हाऊस प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे.

राज्यातली कॉल सेंटर्स ATSच्या रडारवर

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 23:53

राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांचे वसतीगृह एटीएसच्या रडारवर आले आहेत. एटीएसनं राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांच्या वसतीगृहातील सर्व मुलांचा रेकॉर्ड मागवला असून याची सर्व जबाबदारी एटीएसनं स्थानिक पोलीसांवर सोपवली आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये स्पेशल सेल ही तयार करण्यात आलेत.

पेशावर विमानतळावर दहशतवादी `रॉकेट हल्ला`, पाच ठार

Last Updated: Saturday, December 15, 2012, 22:38

पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर जवळजवळ २५ लोक जखमी झालेत. जखमींना तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

चामडी विकून पाक अतिरेक्यांनी कमविले ८० कोटी

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 15:51

पाकिस्तानात प्रतिबंधित दहशतवादी संघटनांनी जनावरांचे कातडे विकू नये, असे निर्बंध झरदारी प्रशासनाने लादलेले असतानाही इद-उल-झुहाचे (बकरी ईद) निमित्त साधून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जनावरांचे चामडे विकून सुमारे ८० कोटी रुपयांची माया जमवली आहे.

दहशतवादी हल्ल्यासाठी ४० तरुण सज्ज?

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 08:31

महाराष्ट्रात पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

कर्नाटकात ९ संशयित दहशतवादी अटक

Last Updated: Thursday, August 30, 2012, 13:39

कर्नाटकात आज ९ संशयित आतंकवाद्यांना अटक करण्यात आलं. हे सर्व संशयित इंडियन मुजाहिद्दीनचे सदस्य असल्याची शक्यता आहे, असं सांगण्यात येत आहे. यापैकी ५ जण हुबळीमधून तर ४ जण बंगळुरूमधून पकडले गेले.

बुलढाण्यात दोन संशयित आतंकवादी अटक

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 21:06

औरंगाबादपाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीतून दोन संशयित अतिरेक्यांना अकोला एटीएसनं अटक केली आहे. अकिल मोहम्मद युसूफ खिलजी आणि मोहम्मद जाफर हुसेन कुरेशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

२१ महिला अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 14:33

लष्कर-ए-तोएबाच्या प्रशिक्षित २१ महिला अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानमधून काश्मीर खोऱ्यातून प्रशिक्षण शिबीर चालविले जात आहे. त्यासाठी महिलांना लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेने हाताशी धरले आहे.