Last Updated: Saturday, December 7, 2013, 21:43
www.24taas.com, झी मीडिया, पणजीतरुण तेजपालच्या अडचणींत आणखीन वाढ झालीये. तरुण तेजपालवर गोवा पोलिसांनी आणखीन तीन गुन्हे दाखल केलेत. तेजपालच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली होती. दरम्यान आज त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान आज तेहलकाच्या माजी व्यवस्थापकिय संपादिका शोमा चौधरी यांची साक्षही नोंदवण्यात आली. शोमा चौधरी नवी दिल्लीहून कालच गोव्यात दाखल झाल्या होत्या. तेजपाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याला गोवा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी आणि पौरुषार्थ चाचणी करण्यात आहे.
यापूर्वी तेजपालला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने त्याला पणजी सत्र न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी न्यायालयात त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याचा निर्णय दिला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 7, 2013, 21:43