तरूण तेजपालच्या पोलीस कोठडीत वाढ

Last Updated: Saturday, December 7, 2013, 21:43

तरुण तेजपालच्या अडचणींत आणखीन वाढ झालीये. तरुण तेजपालवर गोवा पोलिसांनी आणखीन तीन गुन्हे दाखल केलेत. तेजपालच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली होती. दरम्यान आज त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

`तेहलका`च्या शोमा चौधरीला पोलिसांची नोटीस

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 16:27

तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आणि इतर महत्त्वाच्या साक्षीदारांना आज गोवा पोलिसांनी नोटीस बजावली. तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी एका महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक

Last Updated: Sunday, December 1, 2013, 12:00

तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

तेजपालचा ४.३० वाजता फैसला, जेल की बेल?

Last Updated: Saturday, November 30, 2013, 14:49

आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल याच्यावर पणजी सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न झाला. लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपाला आहे. साडेचारनंतर कोर्टाची अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.

अटक टळली, गोवा पोलिसांची तेजपाल यांना मदत - आभा सिंग

Last Updated: Friday, November 29, 2013, 12:02

गोवा पोलिसांनी दिल्लीमध्ये तरुण तेजपालांच्या निवासस्थानी छापा टाकला मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.त्यामुळे तेजपाल कुठे लपलेत, असा प्रश्न निर्माण होतोय. गोवा पोलीसच तेजपाल यांना मदत करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील आभा सिंह यांनी म्हटलंय.

तरूण तेजपाल यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल

Last Updated: Saturday, November 23, 2013, 09:28

दुसऱ्यांसाठी खड्डा खोदणारे कधी कधी स्वतःच खड्ड्यात पडतात... याचे ताजे उदाहरण म्हणजे `तहलका`चे पत्रकार तरूण तेजपाल... तेजपाल यांच्याविरूद्ध गोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. हा अजामीनपात्र गुन्हा असल्यानं लवकरच तेजपाल यांना अटक होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्यांचे भांडे फोडणाऱ्या तरूण तेजपालचा "लैंगिक तेहलका"

Last Updated: Thursday, November 21, 2013, 19:02

स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून करोडो रूपयांचे घोटाळे उघडकीस आणणा-या तेहलका मॅगझिनचे एडिटर इन चीफ तरूण तेजपाल यांच्यावर एका महिला पत्रकाराने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केलाय. या आरोपानंतर तरूण तेजपाल यांनी तूर्तास सहा महिन्यांसाठी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतलाय.