तहलका : तेजपाल आणि पीडित मुलीचे खाजगी ई-मेल लीक , Tarun Tejpal explains why he did it... Email leak

तहलका : तेजपाल आणि पीडित मुलीचे खाजगी ई-मेल लीक

तहलका : तेजपाल आणि पीडित मुलीचे खाजगी ई-मेल लीक

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याच्यावर त्याच्याच एका सहकारी महिलेनं लैंगिक छळाचा आरोप केला. त्यानंतर तरुण तेजपालनं संबंधित मुलीला ई-मेल पाठवून माफी मागून समजावण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा या मुलीनं त्याला जशास तसं उत्तर ई-मेलद्वारेच दिलं... आणि हे दोन्हीही ई-मेल आता ‘लीक’ झालेत. या मेलमध्ये ही दोघंही त्या घटनेबद्दलच बोलत आहेत. एका बलॉगवर या दोघांचं हे ई-मेल संभाषण जाहीर करण्यात आलंय.

हा ई-मेल तरुण तेजपालनं पीडित पत्रकार तरुणीला १९ नोव्हेंर रोजी पाठवला होता. लिफ्टमध्ये घडलेल्या प्रकारानंतर त्यानं तरुणीला पाठवलेला हा पहिला मेल होता. नेमकं या ई-मेलमध्ये काय म्हटलं होतं, पाहुयात... या ईमेलमधील काही नावं काही कारणास्तव उघड केली गेली नाहीत, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

‘त्या’ घटनेसंबंधी... < /b>
तरुण तेजपाल
‘त्या’ रात्रीच्या विषयी म्हटलं तर, तुला आठवत असेल आपण नशेत होतो, हास्य-मस्ती आणि फ्लर्टी संभाषणातमध्ये वेगवेगळ्या इच्छा आणि सेक्सचा विषय सुरू होता. आपण त्या वादळी संध्याकाळच्या भेटीला आठवत होतो जेव्हा मी ऑफिसमध्ये बसून आभाळातील ढगांना बघत बसलो होतो. मी हे सांगू इच्छितो की त्यावेली तु मला म्हटलं होतंस की ‘तुम्ही माझे बॉस आहात’. यावर मी म्हटलं होतं की, ही तर आणखीनच चांगली गोष्ट आहे. पण याच वेळी मी तुला हेही सांगितलं होतं की यामध्ये तुझ्यात आणि माझ्यात असलेल्या नात्याशी याचा काहीएक संबंध नाही.

पीडित मुलगी
त्या रात्री झालेल्या संभाषणात ना फ्लर्टचा अंश होता आणि ना ते नशेत केलं गेलेलं संभाषण होतं. तुम्ही सेक्स आणि इच्छांबद्दल बोलत होतात, कारण तुम्ही माझ्याशी बोलताना नेहमीच याविषयावरच बोलत होता. मला खूप वाईट वाटतंय की तुम्ही कधी माझ्या कामाबद्दल माझ्याशी चर्चा केली नाही.... आणि तेव्हा तुम्ही माझी स्टोरी वाचण्यासाठी वेळ काढला असता तर माझ्याशी लैंगिक चाळे करण्याची तुमची हिंमतही झाली नसती. तुम्हाला याचा अंदाजा आला असता की माझ्यासोबत असं काही घडलं तर मी गप्प बसून राहणाऱ्यातली नाही. ‘त्या’ रात्री आपण कोणत्याच वादळी ढगांचीही चर्चा केली नव्हती. मला तर तुमच्याशी त्या पहिल्या स्टोरीबाबत बोलायचं होतं, जी बलात्कारापासून वाचण्यासाठी धडपडणाऱ्या एका मुलीविषयी मी तुमच्यासोबत लिहिली होती. XXXX नं मला तुमच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. मी आत गेले, तेव्हा लाईट बंद करून तुम्ही काऊचवर पहुडलेल्या अवस्थेत होतात. मी लाईट सुरू करण्यास विचारलं तेव्हा तुम्ही त्याला नकार दिला. तुम्ही काऊचवर त्याच स्थितीत पडून राहिलात. मी तुमच्यासमोर खुर्चीवर बसून राहिले आणि त्या मुलीची कथा तुम्हाला ऐकविली. तुम्ही त्यावेळी त्याच प्रोफेशनल कारणांना आठवलं होतं... वादळ किंवा ढगांना नाही.


सहमती किंवा असहमतीबाबत... < /b>
तरुण तेजपाल
हे सर्व काही झालं तेव्हाचं वातावरण आणि मूड मस्तीनं भरलेला होता. मला असं एका क्षणासाठीही वाटलं नाही की तू नाराज आहेस. जेव्हापर्यंत दुसऱ्या रात्री XXXXनं मला नाही सांगितलं, तेव्हापर्यंत मला समजलंच नाही की, हे सगळं तुझ्या सहमतीशिवाय झालंय. मी पूर्णपणे शॉकमध्ये होतो आणि संपूर्णत: हादरलो होतो. याचं कारण म्हणजे तुला वाटलं होतं की मी तुझ्याशी जबरदस्ती केलीय (आणि माझा असा काहीही उद्देश नव्हता). मी शॉकमध्ये होतो कारण मी माज्या मुलीच्या अगदी जवळच्या मैत्रिणिसोबत बेजबाबदारी आणि मूर्खतापूर्ण असं काहीतरी वर्तन केलं होतं. त्यावेळी मला माझीच लाज वाटली आणि माझी मान आत्ताही खालीच आहे (जी गोष्ट खरी नाही, ती ही की मी कधीच धमकीचा एक शब्दही उच्चारला नव्हता)

पीडित मुलगी
माझी असहमती यापासून जाहीर होते, जसं की, तुम्ही माझ्यावर हात टाकला तेव्हा मी तुम्हाला थांबण्यास सांगितलं होतं. मी त्या प्रत्येक व्यक्तीची आणि तत्वांची आठवण तुम्हाला करून दिली जी दोघांसाठीही खूप महत्त्वाची आहेत (तुमची मुलगी, पत्नी, शोमा, माझे वडील). मी हेदेखील सांगितलं की तुम्ही माझे एम्प्लॉयर आहात. पण, तेव्हा तुम्ही मात्र काहीही ऐकलं नाही... आणि तुमचं माझ्याशी गैरवर्तन सुरूच राहीलं. दुसऱ्या दिवशीही तुम्ही तेच पुन्हा केलंत. तहलकाच्या एडिट मिटिंग्समध्ये आपण त्या पुरुषांबद्दल चर्चा केली जे हैवान बनतात. तुम्ही तुमच्या स्टोरीजमध्येही याचा उल्लेख केला आहे. त्या सगळ्यांचं हेच फलित आहे का? ज्याला कुणालाच समजून घ्यायचं नाहीए?

तुम्ही मला XXXला या घटनेबद्दल सांगितल्याबद्दल धमकावलंच नव्हतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी टेक्स्ट मॅसेजही पाठवला होता. ज्यामध्ये म्हटलं होतं, ‘मला खरं वाटत नाहीए की तु त्याला एवढी छोटीशी गोष्ट सांगितली...’ तरुण मला भरवसा होता की तू आपल्या मुलीच्या मैत्रिणीला आणि तिच्याच वयाएवढ्या एम्प्लॉयीचं लैंगिक शोषण करण्याचा विचारही करू शकाल. ही खूप छोटी गोष्ट होती का?


घटनेबाबत माफीनामा... < /b>
तरुण तेजपाल
तू हे स्पष्ट केलंस की माझी समजण्यामध्ये काहीतरी चूक झाली. तुला येणारा राग आणि तुला लागलेल्या धक्क्याला समजू शकतो. आणि यावर मी काहीच बोलणार नाही. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण आहे. जे काही मजा-मस्तीमध्ये होत होतं... असं वाटलंही नव्हतं की त्याचा परिणाम इतका वाईट होईल. मला माफ कर आणि त्या गोष्टीला विसरून जा. मी तुझ्या आईला भेटेन आणि त्यांची माफीही मागेन. तुला हवं असंल तर XXXXचीही मी माफी मागण्यास तयार आहे. माझी अशी इच्छा आहे की तू पहिल्याप्रमाणेच तहलकासाठी काम करावस आणि शोमाला रिपोर्ट करत राहा. तहलका आणि शोमानं कधीच तुला निराश केलेलं नाही. माझी शिक्षा मला मिळालीय आणि कदाचित माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ही शिक्षा मला मिळत राहील.

पीडित मुलगी
तुमची, XXXXची माफी मागण्याची इच्छा बघून मला असं वाटतंय की तुम्ही मला त्याची प्रॉपर्टी समजत आहात आणि स्वत:ला त्याला उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असल्याचं मानत आहात. यामधून तुमच्या पुरुषवादी विचारांचा वास येतोय, ज्यामध्ये असं समजलं जातं की महिलांच्या शरीरावर पुरुषांचा अधिकार आहे.

जर तुम्हाला कुणाची माफीच मागायची असेल तर तहलकाच्या त्या कर्मचाऱ्यांची मागा, ज्यांनी त्यांच्या हृद्यामध्ये स्थान देऊन तुम्हाला सन्मान प्रदान केला. कृपया, यापुढे मला पर्सनल मेल करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही हा अधिकार तेव्हाच गमावलात जेव्हा तुम्ही माझ्या विश्वासावर आणि शरीरावर हल्ला केलात.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 28, 2013, 23:17


comments powered by Disqus