Last Updated: Thursday, November 28, 2013, 15:05
तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज दुपारपर्यंत हजर होण्याचे समन्स गोवा पोलिसांनी तेजपाल यांना बजावले आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेच हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये तेजपाल तरूणीसोबत दिसत आहेत. त्यामुळे तेजपाल यांच्या सुटकेची शक्यता कमी आहे.