तरूण तेजपाल यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखलTarun Tejpal sexual assault case: Tehelka managi

तरूण तेजपाल यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल

तरूण तेजपाल यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल
www.24taas.com, झी मीडिया, गोवा/नवी दिल्ली

दुसऱ्यांसाठी खड्डा खोदणारे कधी कधी स्वतःच खड्ड्यात पडतात... याचे ताजे उदाहरण म्हणजे `तहलका`चे पत्रकार तरूण तेजपाल... तेजपाल यांच्याविरूद्ध गोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. हा अजामीनपात्र गुन्हा असल्यानं लवकरच तेजपाल यांना अटक होण्याची शक्यता आहे.

गोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्या नंतर शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांचं पथक तेजपाल यांच्या निवासस्थानी दाखल झालं. मात्र ते अटक करण्यासाठी नाही तर तेजपाल यांच्या निवासस्थानी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोहोचले होते.

तेजपाल यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप तहलकामध्येच काम करणाऱ्या एका महिला पत्रकारानं केलाय... गोव्यामध्ये झालेल्या ‘तहलका’ थिंक फेस्ट कार्यक्रमाच्या वेळी एका हॉटेलमध्ये लैंगिक शोषणाचा हा प्रकार घडल्याची तक्रार या महिला पत्रकारानं तहलका व्यवस्थापनाकडे केली होती.

याप्रकरणी गोवा पोलिसांनी स्वतःहून भादंविच्या कलम ३५४, ३७६ आणि ३७६ ब अन्वये बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केलाय, अशी माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक किशन कुमार यांनी दिलीय.

गोवा क्राईम ब्रँच आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्याचं तेजपाल यांनी मान्य केलंय. याप्रकरणी तेजपाल यांना समन्स पाठवण्यात आलं असून, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान, याप्रकरणी तेजपाल यांना तहलका व्यवस्थापन पाठीशी घालत असल्याच्या आरोपाचा शोमा चौधरी यांनी इन्कार केलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013, 09:28


comments powered by Disqus