Last Updated: Friday, November 29, 2013, 20:36
www.24taas.com, झी मीडिया, गोवासहकारी तरुणीवरील लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाचे तरुण तेजपाल यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. तेजपाल यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तेजपाल यांची अटक टळलीय.
गेल्या काही दिवसांपासून गोवा पोलिसांना झुलवणारे तरूण तेजपाल आज प्रकट झाले. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून त्यांनी गोव्याला जाणारं विमान पकडलं. गोव्यात विमानतळावर आल्यानंतर भाजपनं तेजपाल यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली.
गोवा कोर्टानं तेजपाल यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी शनिवारपर्यंत लांबणीवर टाकल्याने गोवा पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही. त्यामुळं तूर्तास तरी तेजपाल यांची अटक टळली आहे. शनिवारी कोर्टात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पोलीस तेजपालांच्या अटेकसंबंधी पुढील कारवाई सुरु करतील.
दरम्यान, `तहलका`चा संपादक तरुण तेजपाल यानं ज्या लिफ्टमध्ये सहकारी पत्रकार तरुणीचं लैंगिक शोषण केलं. त्या लिफ्टमध्ये कॅमेरा नसला तरी लिफ्टच्या बाहेर असलेल्या कॅमेऱ्यात पीडित तरुणीला लिफ्टमध्ये खेचताना तेजपाल पकडले गेले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज गोवा पोलिसांच्या तपासात अत्यंत महत्वाचा पुरावा ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 29, 2013, 20:36