अखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक, Tarun Tejpal arrested by Goa police

अखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक

अखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक
www.24taas.com, झी मीडिया, पणजी

तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

तेजपालवर आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. अटक टाळण्यासाठी तेजपाल यांनी अटकपूर्व जामीनअर्ज केला होता.

सकाळी न्यायाधीश अनुजा प्रभूदेसाई यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला आणि सायंकाळी साडेचार वाजता निर्णय दिला जाईल, असं सांगितलं. मात्र हा निकाल रात्री ८.१५ च्या सुमारास आला.

कोर्टात आधी तरूण तेजपालच्या वकील गीता लुथरा यांनी युक्तीवाद केला. त्यांनी तेजपाल हे तपासात गोवा पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा करत अटक हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलं. तेजपालची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगत त्याला जामीन देण्याची मागणी केली आहे. तर, गोवा पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 30, 2013, 22:31


comments powered by Disqus