Last Updated: Saturday, October 5, 2013, 14:39
www.24taas.com, वृत्तसंस्था, हैदराबाद आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष पसरला आहे.. सरकारने विभाजन मागेघ्यावं या मुद्द्यासाठी वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.ए. जगन मोहन रेड्डी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. वाय.एस.आर. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच ते उपोषणाला बसलेत.
विभाजनाच्या मुद्यावरून सीमांध्रात असंतोष खदखदत आहे. ७२ तासांच्या बंदमुळे येथील जनजीवन विस्कळीत झालंय. विजयवाडा येथेही हजारो तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांनी तेलंगण निर्मीतीविरोधात तीव्र निदर्शने केलीत. केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वतंत्र तेलंगणा राज्य़ाच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सीमांध्रातल्या जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी आता तिहेरी राजकीय संघर्ष सुरू झालाय.
वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांनी यात आघाडी घेतली असून त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केलीय. तर सीमांध्रातल्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूंना मात्र अजूनही सूर गवसलेला नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, October 5, 2013, 14:39