‘बोधगयावर हल्ला दहशतवाद्यांकडूनच...’, terror attack in bodhgaya - home ministry

‘बोधगयावर हल्ला दहशतवाद्यांकडूनच...’

‘बोधगयावर हल्ला दहशतवाद्यांकडूनच...’
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

बिहारमध्ये रविवारी पहाटे पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवाद्यांनीच घडवून आणले, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या स्फोटांमध्ये दोघांना आपले प्राण गमवावे लागलेत तर पाच जण गंभीर जखमी आहेत.

महाबोधी मंदिरातील परिसरात आज पहाटेच साखळी बॉंम्बस्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आलीय. घटनास्थळावर थोड्या थोड्या कालावधीच्या अंतरावर आठ बॉम्बस्फोट घडवून आणले गेले तर एक जिवंत बॉम्ब पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केलाय.

‘हा हल्ला दहशतवाद्यांकडूनच घडवून आणला गेलाय... अजून तरी याबद्दल काही पुरेशी माहिती मिळाली नसली तरी याबद्दल तपास चालू आहे आणि लवकरच या हल्ल्याच गुपित उघडेल’ असं केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी म्हटलंय. राष्ट्रीय शोध एजन्सी (एनआयए) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजीच्या) तुकड्या या घटनेचा तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, July 7, 2013, 12:49


comments powered by Disqus