श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद,Terror attack on Army convoy in Srinagar

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद
www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर
श्रीनगरच्या हैदरपुरा भागात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची वृत्त आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात चार जवान शहीद तर सात जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हिजबुल मुज्जाहिद्दीन यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सायंकाळी साडे पाच पर्यंत आलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता. लष्कराने या सर्व एरियाला घेरले आहे. लष्करांच्या जवानांवर गेल्या दोन दिवसांपासून हा दुसरा हल्ला आहे. गेल्या शनिवारी श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले होते.

पंतप्रधानांचा नियोजत दौऱ्याबद्दल समजल्यावर काश्मीर खोऱ्यात जवानांवर हल्ल्याच्या घटना वाढल्याच्या दिसून आल्या आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग येत्या २५ जून रोजी काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 24, 2013, 18:04


comments powered by Disqus