संसदेकडून देशाला अपेक्षा - राष्ट्रपती - Marathi News 24taas.com

संसदेकडून देशाला अपेक्षा - राष्ट्रपती

www.24taas.com, नवी दिल्ली
 
आज हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या भारतीय संसदीय लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात येतोय. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना संबोधित केलं.
 
देशवासियांना संसदेकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे संविधानाचं पावित्र्य जपणं गरजेचं आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटल आहे. तसंच भ्रष्टाचार मिटवणं ही खरी गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटलं आहे. संसदीय लोकशाहीच्या हीरक महोत्सवानिमित्त 1952 ते 1957 दरम्यान पहिल्या लोकसभेवर मणिपूरमधून निवडून आलेल्या 93 वर्षीय रिशांग किशिंग, बिलासपूरमधून निवडून आलेले रेशमलाल जांगडे आणि एस. टिळक  यांचा राष्ट्रपतींनी सत्कार केला. याशिवाय हीरक जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांचं राष्ट्रपतींनी विमोचन केलं. तसंच लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांनी काढलेल्या आठ पुस्तकांचे राष्ट्रपतींनी प्रकाशन केलं.

First Published: Sunday, May 13, 2012, 20:52


comments powered by Disqus