निरोप राष्ट्रपतींना...

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:55

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या लवकरच आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. २३ जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य राष्ट्रपतींना निरोप देणार आहेत.

उदार राष्ट्रपती... मृत व्यक्तीलाही दिलं 'जीवदान'

Last Updated: Saturday, June 23, 2012, 15:14

राष्ट्रपती प्रतिभाताई आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती... आता आणखी एक इतिहास त्यांनी आपल्या नावावर नोंदवलाय. फाशिची शिक्षा सुनावलेल्या ३५ कैद्यांची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेत बदलणाऱ्या त्या भारताच्या गेल्या तीन दशकांतील पहिला राष्ट्रपती ठरल्यात.

प्रतिभा पाटील, विलासराव यांचे भूखंड वादात

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 17:22

बड्या राजकीय नेत्यांच्या संस्थांना दिलेले भूखंड परत का घेण्यात येऊ नयेत, असा सवाल पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी या संस्थाना पाठवलेल्या नोटिसांमध्ये विचारला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, जयंत पाटील यांच्याशी संबंधित या संस्था आहेत.

संसदेकडून देशाला अपेक्षा - राष्ट्रपती

Last Updated: Sunday, May 13, 2012, 20:52

आज हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या भारतीय संसदीय लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात येतोय. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना संबोधित केलं.

राष्ट्रपतींनी पुण्यातील जमीन केली परत

Last Updated: Friday, April 27, 2012, 20:10

राष्ट्रपती प्रतिभा पाटील निवृत्तीनंतर पुण्यात राहायला जाणार नाहीत. राष्ट्रपतींनी पुण्यातल्या बंगल्याची जागा परत केलीय. याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून निर्णय कळवलाय.

राष्ट्रपतींचा बंगला वादाच्या भोव-यात

Last Updated: Friday, April 13, 2012, 10:52

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी पुण्यात बांधण्यात येत असलेला बंगला पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. या बंगल्यासाठी नियमापेक्षा अधिक जागा देण्यात आल्याचा आरोप जस्टीस फॉर जवान या संस्थेनं केलाय. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे.

राष्ट्रपती टेबल टेनिस खेळतात तेव्हा....

Last Updated: Monday, March 26, 2012, 09:27

देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी टेबल टेनिस खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. टेबल टेनिसच्या कोर्टावर त्यांनी जोरदार फेटकेबाजीही केली आहे. राष्ट्रपती ह्या टेबल टेनिस प्लेअर्स आहेत.

नौदलाच्या ताफ्यात ८० नव्या युद्ध नौका

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 14:33

नौदलाच्या ताफ्यात येत्या दोन वर्षात ८० नव्या युध्दा नौका दाखल होणार आहेत. या ताफ्यात विमानवाहू तसंच अणवस्त्र सज्ज पाणबुड्यांचा देखील समावेश आहे. नौदलाच्या युध्द नौकांच्या ताफ्याचे सरासरी वय या नव्या युध्द नौकांच्या समावेशामुळे कमी होणार असल्याचं नौदलाचे प्रवक्ते कमांडर पी.व्ही.एस.सतीश यांनी सांगितलं.