Last Updated: Thursday, December 1, 2011, 05:52
झी २४ तास वेब टीम, 
रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांच्या हिताचा नसलेला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली.
किरकोळ बाजारपेठेत विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय व्यापारी महासंघानं आज भारत व्यापार बंदचा नारा दिला. या बंदमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाचही बाजारपेठा सहभागी होणारेत. नवी मुंबईतील रिटेल व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होणार आहे. माथाडी कामगारांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला.
नागपूरमध्येही भारत बंद आंदोलनात ७० हजार व्यापारी सहभागी होणारेत. त्यामुळं आज होणा-या बंदचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांसाठी हिताचा नसलेला हा निर्णय केंद्र सरकारनं मागे घेण्याच्या मागणीसाठी हा भारत बंद पुकारण्यात आला. मात्र, रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीवर ठाम असलेले केंद्र सरकार खरंच या दबावासमोर झुकेल का? हाच खरा प्रश्न आहे...
First Published: Thursday, December 1, 2011, 05:52