रिटेलचा निर्णय मागे घेणे अशक्य- मनमोहन - Marathi News 24taas.com

रिटेलचा निर्णय मागे घेणे अशक्य- मनमोहन

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
देशभरात रिटेल सेक्टरमधील परदेशी गुंतवणुकीचा व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. तर दुसरीकडे हा निर्णय मागे घेणे कठीण असल्याचे स्पष्ट मत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मांडले आहे. रिटेल सेक्टरमधील परदेशी गुंतवणुकीला विरोधकांबरोबरच युपीएतील काही घटक पक्षांचाही विरोध आहे.
हा विरोध पाहून मित्र पक्षांचं मन वळवण्यासाठी पंतप्रधानांनी आज यूपीएच्या मित्र पक्षांची बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर तृणमूल काँग्रेसने रिटेल सेक्टरमधील परदेशी गुंतवणुकीला आपला विरोध कायम ठेवला आहे.
बैठकीनंतर पंतप्रधान म्हणाले, रिटेलमधील एफडीआयच्या गुंतवणुकीचा निर्णय मागे घेणे कठीण असून हा देशासाठी महत्वाचा निर्णय असल्याचंही त्यांनी म्हटलंय, यामुळे आता आपण मागे हटणार नसल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे.

First Published: Thursday, December 1, 2011, 12:27


comments powered by Disqus