आयपीएल बंदच व्हायला हवं - लालू - Marathi News 24taas.com

आयपीएल बंदच व्हायला हवं - लालू

, नवी दिल्ली
 
आयपीएल सध्या सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरलाय. या चर्चेत आता राजद प्रमुख लालू प्रसाद यादवही सहभागी झालेत. आयपीएल बंद व्हायला हवं, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
अभिनेता शाहरुख खान यानं वानखेडेवर घातलेला दंगा आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांबरोबर केलेल्या वादविवादासंबंधी प्रतिक्रिया विचारल्यानंतर लालूं म्हणतात की, आयपीएल बंदच व्हायला हवं. शाहरुख खान आणि एमसीएच्या वादविवादांसंबंधी त्यांना विचारलं असता ‘घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या इशाऱ्यावर काम केल्याचा’ आरोप त्यांनी केला.
 
हे सगळं खुन्नसबाजीमध्ये केलं गेलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशननं आज कोलकाता नाईट रायडर्सचा भागीदार आणि बॉलिवूनड सुपर स्टार शाहरुख खानवरनं अधिकाऱ्यांबरोबर गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ५ वर्षांसाठी वानखेडे स्टेडियमवर प्रवेश बंदी घातलीय.
 

First Published: Friday, May 18, 2012, 18:32


comments powered by Disqus