भंवरी देवी प्रकरणात आणखी एक मंत्री अटकेत - Marathi News 24taas.com

भंवरी देवी प्रकरणात आणखी एक मंत्री अटकेत

झी २४ तास वेब टीम, जोधपूर 
 
बेपत्ता नर्स भंवरी देवी प्रकरणात सीबीआयने आज राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरणा आणि सत्ताधारी काँग्रेसच्या एक आमदारांच्या बंधुंना अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी सीबीआयने तीन इतर आरोपींविरुद्धही आरोप पत्र दाखल केलं. या प्रकरणातकाही महत्त्वाचे पुरावे
हाती आल्यानंतरच सीबीआयने मदेरणा आणि पारसराम बिश्नोई यांना अटक केली असल्याचे म्हटले जात आहे.
 
या प्रकरणात नाव समोर आल्यावर कॅबिनेटमधून यापूर्वीच हकालपट्टी झालेल्या मदेरणा (५९) आणि आमदार मलखान सिंह यांचे बंधू पारसराम बिश्नोई यांना चौकशीसाठी आज संध्याकाळी अटक करण्यात आली आहे.
 
सीबीआयने या प्रकरणातील शहाबुद्दीन, बलदेव जाट आणि सोहनलाल या तीन जणांविरुद्ध आधीच आरोपपत्र दाखल केलं आहे. या तिघांनी खुनाच्याच इराद्याने ३६ वर्षीय भंवरी देवीच्या अपहरणाचा कट केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
 
जोधपूर येथील बिलाडा उपखंडातील उप आरोग्य केंद्रात भंवरी देवी नर्स म्हणून काम करत होती. एक सप्टेंबर रोजी ती अचानक गायब झाली. सीबीआय या संदर्भात चौकशी करत आहे.

First Published: Friday, December 2, 2011, 17:05


comments powered by Disqus