Last Updated: Wednesday, May 23, 2012, 12:56
www.24taas.com, मुंबई सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागण्याची चिन्ह आहेत. ऑईल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं पेट्रोल दरवाढीचं संकट अधिकच गडद झालंय.
आठवड्याभरात पेट्रोलची किमान चार ते पाच रुपयांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे. डिझेल आणि घरगुती गॅसवरील सबसिडी कमी करण्याचे संकेत सरकारनं दिल्यामुळं डिझेलची तीन ते चार रुपये तर गॅसची 50 रुपयांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलच्या प्रती लिटरमागे आठ रुपयांचा तोटा होत असल्याचं ऑईल कंपन्यांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळं तोट्याचा निम्मा बोजा ग्राहकांवर टाकण्याचे संकेत ऑईल कंपन्यांनी दिले आहेत. यासंदर्भात इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं सरकारकडे मागणीही केलीय. त्यामुळं या आठवड्यात पेट्रोल दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे.
First Published: Wednesday, May 23, 2012, 12:56