पेट्रोलमध्ये पुन्हा एकदा ७० पैशाने दरवाढ

Last Updated: Monday, July 23, 2012, 20:33

पेट्रोलचा भडका पुन्हा एकदा झालेला आहे. काही दिवसापूर्वी जवजवळ ७.५० रूपयाने वाढ केल्यानंतर, पुन्हा ४ रूपयाने त्यात कपात करून जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न सरकारने केला खरा मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोलमध्ये ७० पैशाने दरवाढ केलेली आहे.

औरंगाबादमध्ये पेट्रोल दरवाढ, शिवसेनेचा विरोध

Last Updated: Monday, June 4, 2012, 14:20

औरंगाबाद शहरात पेट्रोलवर १ टक्का आणि डिझेल वर २ टक्के अधिभार लादण्याचा निर्णय राज्यसरकरानं घेतलाय. राज्य शासनाची ही कर आकारणी औरंगाबाद, नागपूर, अमरावती,धुळे, नंदुरबार या पाच शहरांमध्ये होणार आहे.

सरकार झालं उदार, पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त!

Last Updated: Saturday, June 2, 2012, 20:03

देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध झाल्यानंतर आता युपीए सरकारने पेट्रोलचे दर 2 रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

देशभरात पेट्रोल दरवाढीचा निषेध...

Last Updated: Thursday, May 31, 2012, 14:57

देशभरात पेट्रोल दरवाढीमुळे संताप उसळलाय. याच संतापामुळे एनडीएनं पुकारलेल्या आजच्या एका दिवसाच्या भारत बंदला भारतात काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. पाहुयात, पेट्रोल दरवाढीवरून देशभरात कसा निषेध केला गेला केंद्र सरकारचा...

महाराष्ट्रात बंदला हिंसक वळण

Last Updated: Thursday, May 31, 2012, 14:56

पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागलाय. पाहुयात आज सकाळपासून कुठे कुठे काय काय घडलं... भारत बंदला कसा मिळाला महाराष्ट्रात प्रतिसाद...

यूपीएला पेट्रोलची झळ

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 23:48

पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. तृणमूल काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर डीएमकेही रस्त्यावर उतरलं. मित्र पक्षांसोबत मनमोहन सिंगाच्या मंत्री मंडळातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्य़ांनीही पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध केलाय.

हायकोर्ट सामान्यांच्या मदतीला...

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 16:04

महागाईत होरपळणा-या सामान्यांच्या मदतीला आता मुंबई हायकोर्ट सरसावलंय. पेट्रोल दरवाढीवर मुंबई हायकोर्टाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय.

भारत बंद : नुकसान केल्यास दंड

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 14:59

एनडीएने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ उद्या ३१ मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे., या बंद दरम्यान काही नुकसान झाल्यास बंदकर्त्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून दंडाच्या रूपाने होणाऱ्या नुकसानीची वसुली केली जाणार आहे.

उद्या 'भारत बंद', पेट्रोल दरवाढीचा निषेध

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 13:48

पेट्रोल दरवाढीचा भडका देशभर उडाला आहे. उद्या NDAनं भारत बंदची हाक दिली आहे. तर CNGच्या मुद्यावर दिल्लीत रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती घटल्यानं पेट्रोल १.६७ पैशांनी कमी होण्याचे संकेत HPCL नं दिले.

पेट्रोल दरवाढ : देशभरात विरोध वाढतोय

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 08:58

देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध होत आहे. करूणानिधी, ममता बॅनर्जीं यांनी कडाडून विरोध केला. तर गोव्यात मनोहर पर्रीकर यांचं सरकार आल्यावर पेट्रोलच्या किमती तब्बल ११ रुपयांनी कमी करण्यात आल्या.गोवेकरांनी हा आनंद एक महिनाही उपभोगला नाही तोवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ करून आम जनतेला धक्का दिलाय.त्यामुळे देशासोबतच गोव्यातही या पेट्रोल दरवाढीचा तीव्र विरोध होत आहे.

ममता, हवं तर पाठिंबा काढा - काँग्रेस

Last Updated: Saturday, May 26, 2012, 20:28

केंद्रातील युपीए सरकारला नेहमीच कोंडीत पकडणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्‍या नेत्‍या ममता बॅनर्जी यांना पेट्रोलदरवाढीवरून हव तर पाठिंबा काढा, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर मागे घेण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात येण्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीत पेट्रोल होणार स्वस्त, महाराष्ट्राचं काय?

Last Updated: Friday, May 25, 2012, 16:45

उत्तराखंड, केरळपाठोपाठ आता दिल्लीतही पेट्रोल स्वस्त होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पेट्रोलच्या करात कपात करण्याचे संकेत दिलेत. इतर राज्यांना जे जमतं ते महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न आता विचारला जातोय.

मंत्र्यांची इंधनावर उधळपट्टी

Last Updated: Friday, May 25, 2012, 12:28

केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसंच राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल 3 कोटी 67 लाख रूपये उधळले आहेत.पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. मात्र दुस-या बाजुला जनतेचे सेवक म्हणवणारे लोकप्रतिनिधी मात्र पेट्रोल, डिझेलवर करोडो रूपये उधळत आहेत.

‘काँग्रेस सरकार हाय-हाय’

Last Updated: Thursday, May 24, 2012, 16:56

एक नजर टाकुयात मुंबई, डोंबिवली, शिर्डी आणि सोलापूरात आज वेगवेगळ्या पक्षांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांवर. विशेष म्हणजे या आंदोलनात ला सामान्यांचा सहभागही उल्लेखनीय होता.

केंद्र सरकार धास्तावलं...

Last Updated: Thursday, May 24, 2012, 13:45

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात देशभर तीव्र संताप निर्माण झालाय. सराकरनंही या संतापामुळं धास्तावलंय.

उत्तराखंडात 'सेस' हटला; महाराष्ट्रात 'व्हॅट'चं काय?

Last Updated: Thursday, May 24, 2012, 13:47

उत्तराखंड सरकारनं मात्र या महागाईपासून आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी पेट्रोलवाढीवरचा सेस हटवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारही महागाईनं होरपळणाऱ्या सामान्यांना दिलासा देईल का?

वणवा पेटवू - सेनाप्रमुखांची गर्जना

Last Updated: Thursday, May 24, 2012, 13:28

पेट्रोलच्या दरवाढीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. महागाईचा आगडोंब उसळूनही जनता काँग्रेसला निवडून देतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

एनडीएनं दिली ‘भारत बंद’ची हाक

Last Updated: Thursday, May 24, 2012, 11:55

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात एनडीएनं ३१ मे रोजी भारत बंद पुकारलाय. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात ३१ मेला म्हणजे पुढच्या गुरुवारी देशभर आंदोलन करण्यात येणार आहे.

पेट्रोल भडकलं... राज्यभर पसरलं...

Last Updated: Thursday, May 24, 2012, 12:57

पेट्रोल दरवाढ... महागाई... आणि त्यात होरपळणारी त्रस्त जनता... मुंबई - गोवा महामार्ग, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली... आता आणखी कुठे व्हायचं बाकी आहे आंदोलन... जनतेच्या संतापाचा तीव्र उद्रेक...

पेट्रोलला तुम्ही किती देणार पैसे?

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 22:02

मुंबई आता झालेले पेट्रोलचे दर ७८.१६ पैसे, पुण्यात आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये ४८ पैसे, नागपूर आता झालेले पेट्रोलचे दर ८० रुपये ६० पैसे, नाशिक आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये २५ पैसे

पेट्रोलमध्ये विक्रमी ७.५० रु. दरवाढ

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 18:55

सामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे, मात्र आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ आहे, पेट्रोल दरवाढ ही तब्बल ७,५० रूपयांनी वाढ झाली आहे.

पुन्हा पेट्रोल, डिझेल, गॅस होणार महाग?

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 12:56

सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागण्याची चिन्ह आहेत. ऑईल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं पेट्रोल दरवाढीचं संकट अधिकच गडद झालंय.

पुणेकरांना राष्ट्रवादीने टोपी घातली

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:40

पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र , निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं पेट्रोलवरची जकात 1 टक्का कमी करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.

"क्या हुवा तेरा वादा..."- पुणेकर

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 23:16

पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय.

पेट्रोल दरवाढ तूर्त टळली

Last Updated: Sunday, April 1, 2012, 14:14

पेट्रोलची शनिवारी होणारी दरवाढ टळल्यामुळे ग्राहकांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

महागाईत दूध आणि पेट्रोलचा भडका

Last Updated: Saturday, March 31, 2012, 14:36

महागाईच्या भडक्यात आज पेट्रोल दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. आज पेट्रोल दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

गोव्याइतकेच महाराष्ट्रात हवे पेट्रोल दर- सेना

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 17:58

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोलचे दर कमी करावेत अशी मागणी शिवसेना आमदार रामदास कदम यांनी केली आहे. नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये गोवा सरकारनं पेट्रोलवरचा व्हॅट कमी केला आहे. त्यामुळं गोव्यात पेट्रोलचे दर ११ रुपयांनी कमी झाले आहेत.

गोव्यात पेट्रोल ११ रुपयांनी स्वस्त

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:20

३१ मार्चपासून पेट्रलचे भाव ५ रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा चालू असतानाच गोवा सरकारने मात्र २ एप्रिलपासून पेट्रोलचे भाव ११ रुपये प्रति लीटरने स्वस्त केला आहे आहे.

नव्या वर्षाची भेट, पेट्रोल वाढ २ रूपयाने थेट?

Last Updated: Monday, January 2, 2012, 08:52

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आम आदमीला पुन्हा महागाईचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलचे दर सव्वा दोन रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. सध्या रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा बोजा पडणार आहे. देशातल्या इंधन कंपन्यांची यासंदर्भात आज बैठक होण्याची शक्यता आहे.

पेट्रोलच्या किंमतीत दीड रुपयांनी वाढ ?

Last Updated: Saturday, December 31, 2011, 12:29

आता परत एकदा पेट्रोलच्या प्रति लिटर १.५० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने त्याचा परिणाम आयातीच्या किंमतीवर झाला आहे.

अंकल सॅमच्या देशात पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 14:46

भारतात पेट्रोलवरील कर जास्त असल्याने, देशात पेट्रोल शेजारील देश आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री आर.पी.एन.सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ६६.४२ पैसे इतकी आहे तर अमेरिकेत पेट्रोल प्रति लिटरसाठी ४४.८८ पैसे मोजावे लागतात.

तृणमूलची पेट्रोल बोंब बे’मोल’!

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 15:33

पेट्रोल दरवाढीवर भडका उडालेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या मागणीला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळले असून सध्या वाढलेल्या किंमती मागे घेण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ममतांची केंद्र सरकारवरची 'ममता' आटली

Last Updated: Friday, November 4, 2011, 13:58

पेट्रोल दरवाढीच्या झळा केंद्र सरकारला बसायला सुरवात झाली आहे. गेल्या वर्षभरात ही पेट्रोलची नववी दरवाढ आहे. युपीएच्या घटक असलेल्या ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून देण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

केंद्र सरकारचा पुन्हा पेट्रोल बॉम्ब

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 16:40

पेट्रोलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. महागाईच्या काळात आम आदमीला आणखी एक झटका बसणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी वाढ आणि रुपयाचं अवमुल्यन झाल्यानं तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 1 रुपये 80 पैशांची वाढ करण्याची मागणी केली आहे.