Last Updated: Thursday, May 24, 2012, 10:42
www.24taas.com, नवी दिल्ली भाजप नेते संजय जोशी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची मुंबईत आज बैठक सुरू झालीय. त्याच्या काहीवेळ आधी जोशी यांनी राजीनामा दिलाय.
आपण हा राजीनाम पक्ष हितासाठी देत असल्याचं, संजय जोशी यांनी म्हटलंय. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री संजय जोशी यांच्यावर नाराज होते. त्यामुळं आजच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा इशारा मोदींनी दिला होता. त्यांच्या समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षातून करण्यात आला. मात्र त्यात यश आलं नाही. शेवटी भाजपला नमत घेत संजय जोशींचा राजीनामा घ्यावा लागाला.
उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराला मोदींना न येऊ देण्यात जोशींचा हात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळंच मोदी जोशींवर नाराज असल्याचीही चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. संजय जोशी हे आरएसएस आणि नितीन गडकरींचे जवळचे सहकारी मानले जातात. मात्र, त्यांना राजीनामा द्यावा लागल्यामुळे हा गडकरी गटाला चांगलाच दणका समजला जातोय. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक, राजस्थानसह विविध ठिकाणी पक्षातल्या नेत्यांनी पक्षाविरोधात बंडाचा पवित्रा घेतल्यानं पक्ष आधीच बॅकफूटवर गेला होता. त्यात आता मोदींमुळे पुन्हा भाजपाला आणखी बॅकफूटवर जावं लागलंय.
First Published: Thursday, May 24, 2012, 10:42