केंद्र सरकार धास्तावलं... - Marathi News 24taas.com

केंद्र सरकार धास्तावलं...

www.24taas.com, नवी दिल्ली
 
पेट्रोल दरवाढीच्या विरोधात देशभर तीव्र संताप निर्माण झालाय.  सराकरनंही या संतापामुळं धास्तावलंय.
 
देशभरात पेट्रोल दरवाढीचा निषेध होतोय. ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरलेत. सरकारच्या निषेधाच्या घोषणा संपूर्ण भारतात ऐकू येत आहेत. नुकतंच ३ वर्षं पूर्ण केलेल्या युपीए - २ सरकारला याची नोंद घ्यावीच लागतेय. त्यामुळेच केंद्र सरकारनं काँग्रेस प्रणित राज्य सरकारांना पेट्रोलवरचे टॅक्स कमी कररण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
तसंच इंडियन ऑईलचे चेअरमन आर एस बुटाला यांना पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी चर्चेसाठी पाचारण केलंय. दरम्यान, दरवाढीविरोधात एनडीएनं ३१ मेला भारत बंदची हाक दिलीय. राज्यातही तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

First Published: Thursday, May 24, 2012, 13:45


comments powered by Disqus