Last Updated: Monday, May 28, 2012, 17:13
www.24taas.com, नवी दिल्ली 
केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री जयपाल रेड्डी यांनी नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. तूर्तास डिझेल आणि गॅसची दरवाढ होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच केरोसिनचे दरही वाढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळं आधीच पेट्रोलच्या दरवाढीमुळं आर्थिक भार सहन करत असलेल्या आम आदमीला थोडासा का होईना पण दिलासा मिळाला आहे.पेट्रोलच्या दरवाढीचा महागाई कसा आणि किती परिणाम होईल, यावर विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर जयपाल रेड्डी यांनी देशवासियांसाठी दिलासादायक बातमी दिली.
डिझेल, गॅस आणि रॉकेलच्या किमती वाढवण्याचा आमचा प्रस्ताव नाही. आजतरी हा प्रश्न सरकारच्या विचाराधीन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर, डिझेल, गॅसचे नवे दर निश्चित करण्यासाठी मंत्रिगटाची बैठक कधी बोलावायची हेही अद्याप ठरलं नसल्याचं ते म्हणाले.
First Published: Monday, May 28, 2012, 17:13