Last Updated: Tuesday, March 27, 2012, 12:24
घरगुती गॅस प्रकरणावरुन अर्थमंत्री अजित पवार यांची कोंडी झाली आहे. आधी काँग्रेसने विरोध दर्शविल्यानंतर राष्ट्रवादीने सावध खेळी करण्याचा डाव रचला. मात्र, विरोधकांनी गॅस वाढीविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यात राष्ट्रवादीने उडी घेतली. काँग्रेसची धार कमी करण्यासाठी राष्ट्रवादीने विरोध करण्याचा डाव केल्याचे सांगितले तरी वाढता सर्वपक्षीय दबावामुळे अजित पवार गॅसवर गेले आहेत.