ब्रह्मेश्वरांच्या हत्येनंतर भोजपूरमध्ये जाळपोळ - Marathi News 24taas.com

ब्रह्मेश्वरांच्या हत्येनंतर भोजपूरमध्ये जाळपोळ

www.24taas.com, पाटणा
 
बिहारमध्ये रणवीर सेनेच्या माजी अध्यक्ष  ब्रह्मेश्वर सिंह याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. ब्रहोश्वर सिंहच्या हत्येनंतर बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरात तणाव निर्माण झालाय. बह्मेश्वर समर्थकांनी बीडीओ ऑफिस, सर्किट हाऊस जाळले. तर अनेक वाहनांची जाळपोळही करण्यात आली.
 
भोजपूर जिल्ह्यात कर्फ्यू जारी करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच ब्रहोश्वर सिंहची जेलमधून सुटका झाली होती. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आहे.
 
दरम्यान,  बिहारमध्ये रणवीर सेना स्थापन केल्यानंतर ते प्रसिद्धिच्या झोतात आले होते.  आज सकाळी हत्या झाल्याचे वृत्त समजताच बिहारमध्‍ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी घटना स्थळाला भेट दिल्यानंतर जमाव संतप्त झाला होता. गोळीबार करण्यासाठी  हल्‍लेखोर मोटरसायकलवर होते.
 
ब्रह्मेश्‍वर सिंह यांनी बिहारमधील जातीसंघर्षाच्‍या काळात उच्‍च जातींच्‍या हितासाठी रणवीर सेनेची स्‍थापना केली होती. त्‍यानंतर १९८०  ते १९९० या दशकामध्‍ये झालेल्‍या अनेक नरसंहाराच्‍या घटनांमध्‍ये रणवीर सेनेचाच हात असल्याचे जानले जाते. ब्रह्मेश्‍वर सिंह यांना बथानी टोला नरसंहार प्रकरणातून उच्‍च न्‍यायालयाने दोषमुक्त केले होते. या निर्णयावर विविध स्‍तरातून टीकाही करण्‍यात आली होती.

First Published: Friday, June 1, 2012, 14:36


comments powered by Disqus