पवार रिटेलमधील एफडीआयवर ठाम - Marathi News 24taas.com

पवार रिटेलमधील एफडीआयवर ठाम

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
FDI बील पास झालं तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदाच होईल, असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. लोकसभेत विरोधी पक्षांनी एफडीआयवर योग्य चर्चा घडवून आणली, तर यातून लवकर मार्ग निघेल असं पवार म्हणालेत. लोकपाल बिलावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. लोकपाल बिलाचा विषय काढताच, संसद चालेल की नाही, अशी शंकाच त्यांनी व्यक्त केली. एफडीआयवर काँग्रेसने एक पाऊल मागे घेतलं असतानाच पवारांनी मात्र यावर आपला आग्रह कायम ठेवलाय.
 
सरकारने रिटेल क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला होणारा विरोधी पक्षांचा, तसेच आघाडीतील घटक पक्षांचा तीव्र विरोध आणि देशभरात भडकलेल्या आंदोलनांच्या रेट्यामुळे तूर्तास स्थगिती दिली आहे. एकीकडे विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घालून संसदेचं कामकाज चालु दिलं नाही तर दुसरीकडे ममता बॅनर्जींसारख्या आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेतृत्वानेही तीव्र विरोध केला.  त्यातच पाच राज्यांच्या निवडणुका येऊन ठेपल्याने सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आहे.

First Published: Monday, December 5, 2011, 16:14


comments powered by Disqus