'भ्रष्टाचाराविरोधात सचिन फटकेबाजी कर' - Marathi News 24taas.com

'भ्रष्टाचाराविरोधात सचिन फटकेबाजी कर'

www.24taas.com,न वी दिल्ली
 
सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याचं अभिनंदन केलंय. भ्रष्टाचाराविरोधात सचिननं संसदेत फटकेबाजी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, आम्ही संसदेबाहेरुन पाठिंबा देऊ, अशी ग्वाही अण्णांनी यावेळी दिली आहे.
 
याशिवाय टीम अण्णांचे सदस्य संतोष हेगडे आणि अरविंद केजरीवाल यांनीही खासदार सचिनचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे. सचिन तेंडुलकरनं आज आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केलीये. सचिननं आज राज्यसभेच्या खासदारकीची हिंदीतून शपथ घेतली.
 
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या दालनात सचिनला शपथ दिली.  क्रिकेटची मैदाने गाजवणा-या विक्रमादित्याला आज नवीन ओळख मिळाली आहे. आता संसदेत त्याची कामगिरी कशी होते याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सचिनसह त्याची पत्नी अंजलीदेखील शपथविधीच्या समारंभाला उपस्थित होती. सचिन हा राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे.

First Published: Monday, June 4, 2012, 19:46


comments powered by Disqus