आनंदवारी - Marathi News 24taas.com

आनंदवारी


.
 
.

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||


तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||


मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||


तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||


 
====================== ===========
 

व्हिडिओ


 


====================== ===========

 
फड दांम्पत्य ठरले ‘मानाचे वारकरी’

फड दांम्पत्य ठरले ‘मानाचे वारकरी’
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यासह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे


====================== ===========

पंढरपुरात मंत्रालयातल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांचा गौरव

पंढरपुरात मंत्रालयातल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांचा गौरव
मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

====================== ===========



 
महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं…

महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं…
शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.


 
====================== ===========
‘याचसाठी केला अट्टहास…’

‘याचसाठी केला अट्टहास…’
ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.


====================== ===========

 
माऊली… माऊली… माऊली…

माऊली… माऊली… माऊली…
युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. आषाढी कार्तिकीची वारी हा मराठी मनाचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि आनंदाच्या परमोच्च सोहळ्यात माऊलीचा ही आनंदवारी सुरु होते..


====================== ===========

पालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर…

पालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर…
सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.


====================== ===========


वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी आतूर

वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी आतूर
विठूरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आता पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर आहेत.. ज्ञानोबा माऊली आणि सोपानदेवांच्या पालखीची काल भेट झाली.



====================== ===========

आषाढीचं एक नवं ‘रिंगण’!आषाढीचं एक नवं ‘रिंगण’!

आपल्याकडे दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. गुढीपाडवा आणि गणपतीचेही विशेषांकही निघतात. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा. मग आषाढी अंक का नाही? म्हणूनच 'आषाढीचा वार्षिक अंक' ही नवी संकल्पना यंदाच्या आषाढी


====================== ============================================
माउलींची पालखी सोलापुरात दाखलमाउलींची पालखी सोलापुरात दाखल

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं फलटणहून विडणी, पिंपरद, निंबळक फाट्यावरून प्रवास करत काल बरडला मुक्काम केला होता. आज माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पालखीचा आजचा मुक्काम नातेपुते इथं असणार आहे.


======================
गोल रिंगणाचा अवर्णनीय सोहळा

गोल रिंगणाचा अवर्णनीय सोहळा
आज तुकोबांच्या पालखीतल्या वारकऱ्यांनीही वारीच्या विसाव्याचा सुंदर अनुभव घेतला. निमित्त होतं इंदापूरमधल्या तिसऱ्या गोल रिंगण सोहळ्याचं...


======================
 
माऊलींची पालखी फलटणमध्ये होणार दाखल

माऊलींची पालखी फलटणमध्ये होणार दाखल
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील फलटण इथं प्रस्थान करणार आहे.


======================

माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज

माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज
पंढरीच्या वारीमध्ये आज रिंगण सोहळ्यांची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय. तरडगावजवळ ‘चांदोबाचा लिंब’ इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण रंगणार आहे.


======================
 
 काटेवाडीत रंगणार ‘गोल रिंगण’…काटेवाडीत रंगणार ‘गोल रिंगण’…

निरा स्नानानंतर माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. यावेळी माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी साता-याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिशय भक्तीभावाच्या वातावरणात माऊलींचं स्वागत करण्यात आलं.


======================

पालखीच्या स्वागतासाठी बारामती – लोणंद सज्जपालखीच्या स्वागतासाठी बारामती – लोणंद सज्ज

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात पोचणार आहे. साताऱ्यातल्या लोणंदमध्ये पालखी आज रात्री विश्रांती घेईल. तर तुकोबांची पालखी बारामती इथं मुक्कामाला असेल.


======================


ट्रक अपघातात नऊ वारकरी ठार

ट्रक अपघातात नऊ वारकरी ठार
नीरा नदीच्या पुलावरुन ट्रक कोसळला. या अपघातात नऊ वारकरी ठार झाले तर सातजण जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेले सर्व वारकरी बारामतीतील कांबळेश्वर गावचे रहिवासी आहेत.


======================


माऊली वाल्हेत, तुकोबा उंडवडीत!

माऊली वाल्हेत, तुकोबा उंडवडीत!
संत माऊलींच्या पालखीनं वाल्हेकडे सकाळी मार्गस्थ झाली. तर वरवंडहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम गवळ्याची उंडवडी इथं असणार आहे. या दरम्यान, तुकाराम महाराजांच्या पालखीनं छोटेखानी रोटी घाट पार केला.


======================
 
‘गाथा’… अभिजित भडंगेची‘गाथा’… अभिजित भडंगेची

सोलापुरातल्या एका उच्च शिक्षित तरुणानं संत तुकारामांची 1000 पानांची गाथा आपल्या सुंदर आणि सुवाच्च अक्षरात लिहली आहे. या माध्यमातून संतांची शिकवण तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचा ध्यास त्यानं घेतलाय..


======================

माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ


माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ
माऊलींची पालखी आज सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ होतेय. तर संत तुकोबांची पालखी यवतहून वरवंडकडे प्रस्थान ठेवतेय. जेजुरीत माऊलींच्या पालखीचं भंडारा उधळत स्वागत करण्यात येणार आहे.


======================
 
राज ठाकरेंच्या पत्नी झाल्या वारकरी

राज ठाकरेंच्या पत्नी झाल्या वारकरी
विठूरायाच्या भेटीसाठी सारे वारकरी आतुर झालेत.. मजल दरमजल करत वार-यांच्या दींड्या आणि पालख्या मार्गक्रमण करत आहेत. लहान थोर, आबालवृद्ध सारेच पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी वारकरी झाल्या होत्या. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह दिसून आला.


======================
 
विठूचा गजर.. दिवेघाटात घुमला

विठूचा गजर.. दिवेघाटात घुमला
आनंदवारीतला आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा असतो. कारण आयुष्याच्या प्रवासातल्या चढणीचा अर्थ सांगणाऱ्या दिवेघाटाचा टप्पा आज वारकरी हरीनामाच्या बळावर लिलया पार पाडला ..


======================
 
ज्ञानोबा-तुकोबा पुण्यात दाखल

ज्ञानोबा-तुकोबा पुण्यात दाखल
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीये. पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले होते. रात्रभर भजन,किर्तनाने पुण्यनगरीत विठुरायाचा जयघोष झाला.

.


======================

तुकोबांचे पहिले रिंगण रंगले पिंपरीत!तुकोबांचे पहिले रिंगण रंगले पिंपरीत!

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज पिंपरीत पार पडलं. गेल्या वर्षीपासून पिंपरीत रिंगण सोहळा सुरू झाला आहे. तिथीनुसार एक दिवस अधिक मिळाल्याने हा रिंगण सोहळा घेण्यात आला आहे. आषाढी वारीतला हा रिंगण सोहळा महत्वाचा मानला जातो.


 
======================
 
एकात्मतेची वारी

एकात्मतेची वारी
पंढरीची वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक गावांना काहीतरी देऊन जाते, काहीतरी शिकवून जाते. देहूतून निघालेले तुकोबा दरवर्षी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर पहिला विसावा घेतात आणि वारी हा फक्त धार्मिक सोहळा न राहता, ऐक्याचा सोहळा होऊन जातो.
 
======================

आळंदीत विठूचा जयघोष

आळंदीत विठूचा जयघोष
ज्ञानोबा-माऊली-तुकाराम...असा जयघोष करत आळंदीमध्ये पंढरपूरच्या वारीसाठी लाखो भाविक दाखल झालेत. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे.


======================
 
तुकोबांच्या पालखीचा मुक्काम सरकारवाड्यात
तुकोबांच्या पालखीचा मुक्काम सरकारवाड्यात

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची आस या वारक-यांमध्ये दिसतेय.. मंदिराच्या परिसरात पालखी दाखल झाली असून, मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम सरकारवाड्यात असणार आहे..


======================
 
‘…पाहीन श्रीमुख आवडींने’
‘…पाहीन श्रीमुख आवडींने’

‘तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने |’... तुकाराम महाराजांच्या याच ओव्यांमध्ये सध्या सगळं देहू रंगलं आहे. जेष्ठ सप्तमी म्हणजे १० जूनला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे.

======================


वारक-यांचा आरोग्य विमा


आषाढी वारीत जमणा-या लाखो वारक-यांना समोर ठेवून एका विमा कंपनीनं आरोग्य विमा बाजारात आणलाय. वारीदरम्यान वारक-यास काही झाल्यास अवघ्या 30 रुपयांच्या प्रिमियमवर एक लाखांचे संरक्षण मिळणारा आहे.

.

======================

संत नामदेवांच्या पालखीचे नरसीतून प्रस्थान


संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालखी सोहळा तथा पायीदिंडी आज नामदेवाचे जन्म स्थान असलेल्या नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्याची सांगता ३ जुलै रोजी होणार आहे.

..

======================




आषाढी वारीसाठी तुकोबांच्या पालखीची सध्या तयारी सुरू आहे. त्यामुळं देहूनगरी सध्या वारकऱ्यांनी फुलुन गेली आहे. येत्या १० तारखेला पालखी पंढरपुरकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहूनगरीत सध्या पालखी प्रस्थानाच्या तयारी सुरू आहे.

.



======================

निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज प्रस्थान


वारी म्हटली की, देहू, आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं जाणा-या पालखी सोहळ्यांचीच चर्चा होते. मात्र ज्ञानोबा माऊलींचे थोरले बंधू आणि गुरू यांच्या पालखी सोहळ्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळेच झी 24 तासनं वारीच्या उगमस्थानाकडे दर्शकांचं लक्ष वेधलंय.

.

======================

अण्णा विठोबाच्या चरणी…


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पंढरपुरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार बंद होऊन देशाची प्रगती होऊ दे असं साकडं अण्णांनी विठ्ठलाला घातलं.

.

======================

 

 

 

=================


फोटो फिचर
देहू, आळंदीत वारकरी मेळा


आम्हा वारकरी…चाललो पंढरपुरी

 
=============================
 
व्हिडिओ पाहा...



















आनंदवारी -१आनंदवारी-२आनंदवारी- 3

 
















विठूचा गजरवारी चालली…राष्ट्रपती विठ्ठलचरणी

======================
 
.
.
.

First Published: Saturday, June 30, 2012, 11:26


comments powered by Disqus