Last Updated: Saturday, June 30, 2012, 11:26
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||
तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||