विनयभंग करणाऱ्या पित्याला मुलीने धाडलं यमसदनी - Marathi News 24taas.com

विनयभंग करणाऱ्या पित्याला मुलीने धाडलं यमसदनी

www.24taas.com, बालाघाट
 
मध्यप्रदेशातील बालाघाट येथे १८ वर्षांच्या मुलीने विनयभंग करणाऱ्या आपल्या पित्याला मामांच्या सहाय्याने यमसदनी धाडले. या धक्कादायक घटनेमुळे या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर लवकरच न्यायालयीन कारवाई होईल.
 
टोप सिंग ढालवी या ५० वर्षीय पित्याने सरोज या आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांनी घाबरून मुलीच्या आईने मुलीला तिचे मामा रामजी गोंड यांच्याकडे ‘ढाबा’ गावी पाठवले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
मुलीला मामाकडे पाठवल्यावर टोप सिंग ढालवी आपल्या मुलीवर बलात्कार करायच्या उद्देशाने मामाच्या घरी आला. यावेळी सगळ्यांनी त्याला अडवायचा प्रयत्न करूनही ढालवी ऐकायला तयार नव्हता. आपल्या मुलीचा विनयभंग करायचा तो प्रयत्न करत असतानाच मुलीने आपल्या मामाच्या मदतीने एक जड वस्तू डोक्यात मारून पित्याची हत्या केली.

First Published: Tuesday, June 12, 2012, 09:12


comments powered by Disqus